
किश्तवाड जिह्यात आज सकाळपासून दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. किश्तवाडच्या जंगलात रियाज अहमद आणि मुदस्सर हजारी हे हिजबुल मुजाहिदीनचे दोन मोस्ट वॉण्टेड दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असून शोधमोहीमही सुरू करण्यात आली आहे.
डुल परिसरातील भग्न जंगलात आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांची पहिली चकमक उडाली. यावेळी राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. काही वेळाने दहशतवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर लष्कर, स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पावले उचलली आहेत.