राज्यात सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांच्या गाडीवरून राजकारण तापलं आहे. ‘अॅण्टेलिया’जवळील स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. अशातच विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेत राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय फेरबदल करण्याचा अधिकार आहे पण कुणाच्या दबावाखाली बदली होईल असं मी मानत नाही. सध्या बदलीसंदर्भात कुठलीही चर्चा नाही. मंत्री योग्यपद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या बदलीचा काही प्रश्नच उपस्थित होत नाही’, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री को प्रशासनिक फेरबदल करने का अधिकार है लेकिन मैं नहीं मानता कि दबाव में बदली होगी। फिलहाल किसी तबादले को लेकर चर्चा नहीं है। मंत्री जी सही ढंग से काम कर रहे हैं, उनको बदलने का कोई सवाल नहीं उठता: राज्य के गृह मंत्री और पुलिस कमिश्नर को बदलने के सवाल पर नवाब मलिक, NCP pic.twitter.com/SXBRZeq4dA
— ANI_HindiNews (@AHindinews) March 17, 2021



























































