हॉलीवूडचे लेखक संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका या संस्थेचे लेखक मोठय़ा प्रमाणात संपावर आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लेखक संपावर जाण्याची ही पहिली वेळ आहे. कमी मोबदल्यात जास्त काम करावे लागते, अशी लेखकांची तक्रार आहे. हॉलीवूडचे लेखक 15 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे हॉलीवूडपटांचे शेडय़ुल सगळे बिघडले आहे. अनेक चित्रपटांच्या निर्मितीला विलंब होत आहे. तसेच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका या संस्थेशी संबंधित लेखक संपावर आहेत. त्याचा परिणाम वॉल्ट डिस्ने पंपनीच्या चित्रपटांवर दिसून येत आहे. डिस्नेने ‘अवतार’ सीरिज आणि ‘मार्वल’ चित्रपटांच्या तीन सिक्वेल चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली आहे.

सुपर हीरोंवर आधारित ‘द पेंग्विन अॅण्ड डेअरडेविल-बॉर्न अगेन’ हा चित्रपट थांबला आहे. रिडले स्कॉट आणि दिग्दर्शक फेडे अल्वारेझ यांचा ‘एलियन’ चित्रपट 16 ऑगस्ट 2024 पर्यंत येऊ शकतो.  ‘अवतार’चा 5 वा सिक्वेल मूळ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर   22 वर्षांनी येणार आहे. तसेच 2026 मध्ये रिलीज होणारा ‘स्टार वॉर्स’ चित्रपट 17 डिसेंबर 2027 पर्यंत येऊ शकतो. संपाचा फटका टेलिव्हिजन शोलाही बसला आहे. लेखक आणि तंत्रज्ञानांचा संप मिटेपर्यंत अनेक बॅनर्सनी आपले प्रोजेक्ट थांबवले आहेत.