
घरगुती बनावटीचे विमान मंगळवारी दुपारी ओक हिल येथे एका झाडावर आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत समोर आली आहे. उड्डाणानंतर लगेचच वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. विमान उंचावर न पोहोचता अचानक डावीकडे वळले. हे सिंगल सीटर विमान झाडावर आदळून खाली कोसळले. या अपघातात 73 वर्षीय वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
फ्लोरिडा येथे राहणारे 73 वर्षीय वैमानिक चार्ल्स अल्बान यांनी सिंगल-इंजिन होममेड विमान स्वतः तयार केले असल्याची माहिती समोर आली आहे. चार्ल्स हे त्यावेळी स्वतः विमान उडवत होते. परंतू विमान आकाशात झेपावताच ते विमान अचानक एका झाडावर आदळले आणि खाली कोसळले. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील विमानतळावरून वैमानिकाने या विमानातून उड्डाण केले. अपघातानंतर पोलीस आणि आपत्कालीन सेवा दल घटनास्थळी पोहोचले व वैमानिकाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैमानिकाचा जीव वाचू शकला नाही.
या प्रकरणी व्हॉलुसिया काउंटी शेरीफ कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, ‘विमानाने उड्डाण करताच वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि ते झाडावर आदळले.’ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर वैमानिकाच्या मृत्यू झाला
























































