घोड्यावरून रपेट मारताना मोबाईलवर बोलला, पोलिसांनी गुन्हा दाखल केला

1723
प्रातिनिधीक फोटो

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे. एखादा चालक असे करताना दिसला तर त्याविरूद्ध वाहतूक पोलीस कारवाई करतात. मात्र घोड्यावरून जाणाऱ्या स्वाराला मोबाईलवर बोलत असताना पकडणे आणि त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाण्याची घटना ही दुर्मिळच म्हणावी लागेल.

सावधान..हाफ पँट किंवा लुंगी घालून वाहन चालविल्यास चौपट दंड!

ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे. न्यू साऊथ वेल्स भागामध्ये एक घोडेस्वार मोबाईलवर बोलत होता. पोलिसांनी या 30 वर्षांच्या घोडेस्वाराला अडवलं आणि त्याच्याविरूद्ध कारवाई केली. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटले की पूर्वी एक दारू प्यायलेला माणूस घोड्यावर बसून जात होता, तेव्हा त्याच्याविरूद्धचा खटला माझ्यासमोर चालला होता, मात्र घोड्यावर बसून मोबाईलवर बोलणाऱ्या माणसाविरोधात खटला चालवला जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. हे प्रकरण विचित्र असल्याचेही न्यायाधीशांनी मान्य केले.

स्लीपर आणि हाफ पँट घातल्याने अभियंत्यांना हॉटेलमधून हाकलून दिलं

ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागात आजही अनेकजण घोड्याचा प्रवासासाठी वापर करतात. घोडा हे तिथल्या पोलिसांच्या लेखी वाहनच आहे. गाडीमध्ये असलेल्या स्पीकरला मोबाईल जोडून तुम्हाला बोलता येऊ शकतं, मात्र घोड्यासाठी अशी काही सुविधा नसल्याचं तिथल्या पोलिसांनी सांगितलं आहे. न्यायाधीशांनी या घोडेस्वाराला 3 महिने कोणत्याही स्वरुपाच्या वादापासून दूर राहिल्या त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यात येईल असं सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या