बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी कसे समजले? ‘मन की बात’मध्ये झाला खुलासा

1110

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला डिस्कव्हरी चॅनलवरीलमॅन व्हर्सेस वाइल्डशोमध्ये दिसले. त्यात सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स त्यांना इंग्रजीतून प्रश्न विचारत होता, तर मोदी त्याला हिंदीतून उत्तर देत होते. बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी कसे समजत होते हा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र याचा खुलासा मोदींनी रविवारीमन की बातया आकाशवाणीवरील शोमध्ये केला.

पंतप्रधान म्हणाले की, यात काही रहस्य वगैरे नाही. वास्तवात बेअर ग्रिल्सने माझ्याशी चर्चा करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याने कानात एक छोटे वायरलेस उपकरण बसवले होते. त्याद्वारे मी हिंदीतून काहीही बोललो, तरी लगेच त्याचा इंग्रजीत अनुवाद होऊन तो बेअर ग्रिल्सला ऐकायला मिळत होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे संवाद सहज सोपा झाला होता. ही सर्व तंत्रज्ञानाची कमाल होती. मोदी पुढे म्हणाले की, मी केलेल्या या शोनंतर लोक मोठय़ा संख्येने जिम कार्बेटबाबत विचारणा करायला लागले.

एपिसोडचा ह्यूजचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मी फिल्मावलेला हा एपिसोड पाहणार्‍यांची संख्या साडेतीन अब्जांवर गेली आहे. हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प 520 स्क्वेअर किलोमीटरपर्यंत पसरला आहे. तेथे भरपूर वाघ आणि भरपूर मगरी आहेत. हा एपिसोड शूट करताना आमच्या टीमला भीती वाटत होती, पण मोदी जराही विचलीत झाले नव्हते, असे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स याने या शोबद्दल म्हटले. उत्तराखंडच्या जिम कार्बेटमध्ये शूट झालेला हा खास एपिसोड देशातच नाही, तर परदेशातही लोकांनी पाहिला. टीव्हीच्या दुनियेत हा एपिसोड टॉप ट्रेडिंगमध्ये होता. खुद्द बेअर ग्रिल्सनेच याबाबतची माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या