आंबेगावमधील तरुणाच्या खून प्रकरणात तिघांना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणाला जबरी मारहाण करीत गंभीर जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानुसार, भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. ही घटना 13 डिसेंबरलाआंबेगाव खुर्द परिसरात घडली होती.

आदित्य महेश कांचन (20, रा. कात्रज, पुणे मूळ गाव उरळीकांचन), संकेत सुरेश पवार (19, कात्रज, पुणे मूळ गाव साळुंगण, ता. भोर), अभिजीत किसन सावंत (24 रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत, तर प्रकाश निवृत्ती रेणुसे (27, कात्रज), असे खून करण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे.

तरुणाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रॉडने आणि दगडांनी मारहाण करण्यात आली होती. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. खुनातील आरोपींची माहिती अंमलदार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, राहुल तांबे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधूत जमदाडे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत, विश्वनाथ गोणे, संतोष खताळ यांनी केली आहे.