सुपर 30 चित्रपटाद्वारे येणार ह्रितिक दर्शकांच्या भेटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हृतिक रोशन सध्या आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीत गुंतलेला आहे. आजच त्याने आपल्या आगामी ‘सुपर 30’ या नव्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ट्विटरवर पोस्ट केले आहे. या नव्या चित्रपटाचा ट्रेलर 4 जूनला प्रदर्शित होईल असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ‘हकदार बनो’ असे कॅप्शन टाकून त्याने एकंदर फिल्मच्या कथेबद्दल हिंट दिली.

सुपर 30 हा चित्रपट गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार हे बिहार मधील एक गणिताचे शिक्षक आहेत. त्यांच्या सुपर 30 या मोहिमेमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. 2002 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमध्ये त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना आईआईटी प्रवेश परिक्षांचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले व 2018 पर्यंत त्यांच्याद्वारे प्रशिक्षित 480 पैकी 422 विद्यार्थी आईआईटीसाठी निवडले गेले होते.

फँटम फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून, विकास बहल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ह्रितिक रोशन आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे.