बारावीची फेरपरीक्षा 16 तर दहावीची 22 सप्टेंबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 16 सप्टेंबरपासून तर दहावीची लेखी परीक्षा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच मंडळाने तोंडी, श्रेणी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

मुख्य परीक्षेत नापास झालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी मिळणारे छापील वेळापत्रक गृहीत धरून त्याआधारे परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

z वेबसाईट ः www.mahahsscboard.in
दहावीची परीक्षा
लेखी
22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर
प्रात्यक्षिक, तोंडी
21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर

बारावीची परीक्षा
लेखी
16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर
प्रात्यक्षिक, तोंडी
15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर