Maharashtra HSC Result बारावीचा आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बारावीचा ऑनलाइन निकाल उद्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. निकालाच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील व त्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पद्धतीनुसार यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्यांकन करण्यात आले. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच बारावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण यानुसार यंदा निकाल जाहीर होणार आहे.

येथे पहा निकाल

  • https://hscresult.
  • 11 thadmission.org.in
  • https://mWshse.co.in
  • hscresult.mkcl.org
  • mahresult.nic.in.
  • https://lokmat.news18.com
  • www.mahresult.nic.in
  • https://mWshse.co.in
  • www.mahahsscboard.in

श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल यंदा तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पुढील एक, दोन संधी उपलब्ध असणार आहेत.