लातूर विभागाच्या निकालात मुलीच अव्वल

सामना प्रतिनिधी । लातूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. लातूर विभागाचा निकाल ८८.३१ टक्के लागला आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश असलेल्या लातूर विभागातील निकालामध्ये मुलीच अव्वल आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ७७ टक्के आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.०४ टक्के आहे.
लातूर विभागातील ६४९ महाविद्यालयातील ८३११६ विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ होते.८२९०४ विद्याथ्र्यांनी परिक्षा दिलेली होती. ७३२१५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. लातूर विभागाचा निकाल ८८.३१ टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील २५५ महाविद्यालयातील ३३५२० विद्यातर्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यातील २९९४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याचा निकाल ८९.३४ टक्के लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील १३३ महाविद्यालयातील १६३०४ विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिलेली होती त्यातील १३६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८३.६४ टक्के लागला आहे. लातूर जिल्ह्यातील २६१ महाविद्यालयातील ३३०८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. २९६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल ८९.५८ टक्के लागला आहे.
    लातूर विभागातील विज्ञान शाखेचा निकाल ९५.६९ टक्के लागला आहे. ३०९४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रथम श्रेणीत १३८६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८०.४१ टक्के लागला आहे. कला शाखेत विशेष प्राविण्यासह १६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रथम श्रेणीत १०५५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. विशेष प्राविण्यासह १६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रथम श्रेणीत ३८१० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. व्यावसायिक शाखेचा निकाल ७७.५८ टक्के लागला आहे. १४९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत १७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.