साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 12 ऑक्टोबर 2025 ते शनिवार 18 ऑक्टोबर 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – वाद वाढवू नका

मेषेच्या सप्तमेषात सूर्य, कर्क राशीत गुरू ग्रहाचे राश्यांतर. मैत्रीत, नात्यात गैरसमज टाळा. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. अडचणींवर मात करावी लागेल. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णय घेणे कठीण होईल. शुभ दिनांक – 12, 13

वृषभ – संमिश्र घटना घडतील

वृषभेच्या षष्ठेशात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे करून घ्या. गुरूचे राश्यांतर प्रगतीकारक ठरेल. नोकरीत प्रभाव राहील. कामात बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र घटना घडतील. शुभ दिनांक – 12, 13

मिथुन – कामे मार्गी लागतील

मिथुनेच्या पंचमेषात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर. आत्मविश्वास, उत्साह वाढवणाऱया घटना घडतील.कामे मार्गी लागतील. परिचय फायदेशीर ठरेल. चांगली संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. शुभ दिनांक – 14, 15

कर्क – योग्य संधीची वाट पहा

कर्केच्या सुखस्थानात शुक्र, स्वराशीत गुरूचे राश्यांतर. अडचणी कमी होण्यास सुरूवात होईल. उतावळेपणा करू नका. संयम बाळगा. योग्य संधीची वाट पहा. नोकरीत टिकून रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिनांक – 17, 18

सिंह – वरिष्ठांची मर्जी राहील

सिंहेच्या पराक्रमात सूर्य, कर्केत गुरू राश्यांतर. या सप्ताहात कोणत्याही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. जिद्द ठेवा. जवळच्या व्यक्ती मदत करतील.  वरिष्ठांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. शुभ दिनांक – 12, 13

कन्या – मतभेद मिटतील

कन्येच्या धनेषात सूर्य, कर्केत गुरू राश्यांतर. योग्य निर्णयासाठी कालावधी ठरेल. आर्थिक व्यवहार पूर्ण करा. मतभेद मिटवता येतील. कला, क्रिडा, साहित्यात बाजी माराल. कार्याला गती मिळेल. परदेश जाण्याची संधी लाभेल. शुभ दिनांक – 14, 15

तूळ – कामात यश मिळेल

स्वराशीत सूर्य प्रवेश, कर्केत गुरूचे राश्यांतर. प्रत्येक दिवस कामात यश देणारा ठरेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. मनावर दडपण राहील. नोकरीत फायदा राहील. धंद्यात जम बसेल. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद मिळेल.शुभ दिनांक – 13, 15

वृश्चिक – अहंकार टाळा

वृश्चिकेच्या व्ययेषात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर. या सप्ताहात संताप, अहंकार टाळा. प्रवासात, व्यवहारात सावध रहा. चांगल्या संधीची वाट पहा. वाद वाढवू नका. वाहन हळू चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबावतंत्र चालणार नाही.  शुभ दिनांक – 17, 18

धनु – मानसिक तणाव वाढेल

धनुच्या एकादशात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर.  कठीण कामे या सप्ताहात करण्याची तयारी ठेवा. धंद्यात वाढ होईल. नोकरीत कामात कुशलता दिसेल. मानसिक तणाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग वाढेल. शुभ दिनांक – 12, 13

मकर – सहनशीलता ठेवा

मकरेच्या दशमेषात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर साहाय्य करणारे ठरतील. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात लाभ होईल. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कलाटणी देणारी घटना घडेल. तणाव वाढवू  देऊ नका. शुभ दिनांक – 14, 15

कुंभ – व्यवहारात सावध रहा

कुंभेच्या भाग्येषात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांतर. मैत्रीत गैरसमज होतील. व्यवहारात सावध रहा. नोकरीत वरिष्ठांची कामे करण्यात व्यस्त रहाल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. शुभ दिनांक – 12, 13

मीन – कर्तव्य विसरू नका

मीनेच्या अष्टमेषात सूर्य, कर्केत गुरूचे राश्यांत. भावनेच्या भरात कर्तव्य विसरू नका. वरिष्ठांना दुखवू नका. कायदा पाळा. वाहनाचा वेग कमी ठेवा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप येतील. सावध रहा. शुभ दिनांक – 14, 15