चीनच्या माजी राष्ट्रपतींना सोहळय़ातून बाहेर काढले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या 20 व्या काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांच्या तिसऱया राज्याभिषेकादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा झाला. देशाचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांना सोहळा सुरू असलेल्या सभागृहातून अचानक जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. जिंताओ हे जागेवरून उठण्यास तयार नव्हते. त्यावेळी तेथील दोघा सुरक्षा रक्षकांनी त्यांचे हात पकडून खेचत बाहेर नेले. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. तसेच पार्टी काँग्रेसनंतर पंतप्रधान ली केकियांग यांची सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी करण्यात आली.

ग्रेट हॉलमध्ये आयोजित सोहळय़ात 79 वर्षीय हू जिंताओ हे पहिल्या रांगेतील सीटवर बसले होते. त्यांच्यासमोरील सीटवर राष्ट्रपती शी जिनपिंग बसले होते.