हुमा कुरैशी नवाजुद्दीनला ‘भाईजान’ म्हणाली आणि रोमँटिक दृश्याचा विचका झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. पिळदार शरिरयष्टी, गोंडस चेहरा आणि गॉडफादर नसतानाही नवाजुद्दीनने आपल्या नावाचा ‘सिक्का’ जोरात चालवून दाखवला. आज त्याची लोकप्रियता शिखरावर असली तरी त्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने. या चित्रपटानंतर त्याची कारकिर्द शिखरावर पोहोचली. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पैसा आणि लोकांचे प्रेमही मिळवले.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरैशी यांची जोडी प्रचंड गाजली. नवाजुद्दीनचे रोमँटिक दृश्ये तर आजही सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरतात. कारण या चित्रपटाआधी त्याने एकदाही रोमँटिक दृश्ये दिली नव्हती. त्यामुळे तो थोडा नर्व्हस झाला होता. अशातच चित्रिकरण सुरू असताना एक किस्सा घडला.

चित्रिकरणादरम्यान हुमा कुरैशी सेटवर नवाजुद्दीन याला भाईजान म्हणून हाक मारायची. परंतु यामुळे नवाजुद्दीन वैतागला होता. नवाजुद्दीनने अखेर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. हुमा मला ‘भाईजान’ नावाने हाका मारत असल्याने अशा स्थितीत रोमँटिक दृश्ये मी कशी करू शकतो? असा सवाल त्याने केला. हा किस्सा नवाजुद्दीनने रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदालत’ या शोमध्ये सांगितला होता.

‘रोमँटिक दृश्ये चित्रित करताना मला अनकंफर्टेबल होते, परंतु दृश्य चित्रित करताना चांगलेही वाटू लागते,’ असे नवाजुद्दीन म्हणाला. या शोमध्ये त्याने चित्रपटामध्ये डान्स करणे आपल्याला आवडत नाही, कारण डान्स करणे येतच नाही, असेही सांगितले.