
मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोचे भांडण सोडवायला गेलेल्या मित्राने महिलेसोबत बलात्कार केला. जेव्हा हादरलेल्या पत्नीने नवऱ्याला हा प्रकार सांगितला त्यावेळी त्याने बायकोलाच तीन तलाक देत घराबाहेर काढले. अखेर महिलेने पोलीस स्थानक गाठत पतीसह त्याच्या मित्राविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
ही घटना भोपाळच्या गौतमनगर परिसरातील आहे. पोलिसांनी पिडीत महिलेची तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. तपासात कळले की पिडीत महिला धर्म बदलून मुस्लिम झाली होती. 28 वर्षाच्या महिलेचे भोपाळमध्ये लग्न झाले होते. नवरा-बायकोत काही कारणांमुळे काही दिवसांपासून वाद सुरु होता. जेव्हा ही गोष्ट नवऱ्याचा मित्र हसीब सिद्धीकीला कळली तेव्हा त्याने दोघांमध्ये मध्यस्थी करण्याच्या निमित्ताने दाम्पत्याच्या घरी पोहोचला. मात्र त्यावेळी महिला घरात एकटी असल्याची संधी साधत त्या नराधम मित्राने तिच्यावर बलात्कार केला.
जेव्हा तिने नवऱ्याला त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचे सांगितले त्यावेळी नवऱ्याने बायकोलाच घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढले. त्यानंतर पिडीत महिला इंदूरला गेली. तिथे पोहोचून पतीसह त्याचा मित्राविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
पिडीतेवर झालेला बलात्कार आणि नवऱ्याने दिलेल्या तीन तलाक प्रकरणी भोपाळचे अॅडिशनल पोलीस कमिशनर सचिन अतुलकर यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपीवर 376 आणि तीन तलाकबाबत तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.




























































