पत्नीस जाळून मारल्याप्रकरणी सासरा व पतीस जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील प्रकरणात पत्नीला जाळून मारल्या प्रकरणी पती व सासरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिक्षा जिल्हा न्यायधिश वर्ग -1 संभाजी ठाकरे यांनी 16 मार्च रोजी ही शिक्षा ठोठावली आहे.

विळेगाव येथील अंत्तेश्वर देवकते याचा विवाह शिवकांता हिच्याशी मे 2015 रोजी झाला होता. सासरा भानुदास देवकते, पती अंतेश्वर देवकते लहान-लहान गोष्टीवरून तिल शिवीगाळ करत होते. तसेच शिवीगाळ का करता विचारले म्हणून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यानंतर नोव्हेंबर 2015 ला सकाळी पतीने शिवकांता हिच्या अंगावर रॉकेल टाकले व सासरा भानुदास देवकत्तेने तिला पेटवून दिले. गंभीर जखमी शिवकांताचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर सासरा व पती यांच्यावर कलम 302, 498(अ) व सहकलम 34 भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला. शिवकांताने मृत्यूपूर्व जवाबात सासरा व पती यांच्याविरोधात जबाब दिला.

या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात येऊन मृत्यूपूर्वी नोंदवलेले जबाब ग्राह्य धरून आरोपी अंतेश्वर देवकते, सासरा भानुदास देवकते यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली व आरोपी भानुदास देवकते याला कलम 498 (अ ) खाली तीन वर्षाचा सश्रम कारावासाची पाच हजार रुपये दंडासह शिक्षा सुनावली आहे.