अखेर न्याय झाला! हैदराबाद चकमकीनंतर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

935

हैदराबादमधील (Hyderabad) राष्ट्रीय महामार्ग 44 जवळ निर्जनस्थळी 4 नराधमांनी असहाय्य डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर या राक्षसांनी तिचा खून केला आणि तिला जाळून टाकले. डॉक्टर तरुणीच्या संपूर्ण जळालेल्या मृतदेहाचे फोटो जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. ज्या ठिकाणी हे पाशवी कृत्य करण्यात आले त्याच ठिकाणी या नराधमांचा खात्मा (Encounter) करण्यात आला.

27 नोव्हेंबरच्या रात्री डॉक्टरचा खून करण्यात आला होता. त्याच्या 8 व्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपींना घेऊन घटनास्थळी घटनेचे नाट्यरुपांतर करण्याचं ठरवलं होतं. आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांकडची शस्त्रे हिसकावली आणि त्यांच्यावर गोळीबारही केला असं सांगण्यात येत आहे. यामुळे पोलिसांनी अखेर त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चौघांनाही यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

या घटनेवर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखेर पीडितेला न्याय मिळाला असा सूर तमाम सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये पाहायला मिळत आहे. यात अल्लु अर्जुन, ऋषी कपूर, रंगोली चंडेल, नागार्जून, समांथा रुथ प्रभू, ज्युनियर एनटीआर, अदिती गोवित्रीकर अशा तमाम सेलिब्रिटींनी न्याय झालाय अशी प्रतिक्रिया देत पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.

वाचा सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया-

आपली प्रतिक्रिया द्या