
हार्टफुलनेस ध्यान क्रियांच्या अनुभवाचा समावेश असलेल्या एकदिवसीय ट्रीपचा एक भाग म्हणून आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहित शर्माने हार्टफुलनेस इन्स्टिटय़ूटच्या हैदराबाद येथील मुख्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि प्रशिक्षण केंद्राच्या आधारशीलेची स्थापना केली. या मैदानाचा आणि प्रशिक्षण केंद्राचा उपयोग हार्टफुलनेस लर्निंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. ‘रोहित शर्मा क्रिकेट स्टेडियम’ असे नाव असलेल्या या सुविधेचा उपयोग हार्टफुलनेसच्या युवा प्रशिक्षणार्थींना त्यांचे क्रिकेटमधील कौशल्य वाढविण्यासाठी होईल.
क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हार्टफुलनेस इन्स्टिटय़ूटचे मार्गदर्शक सायलेंट चेंजमेकर दाजी यांनी कान्हा शांतिवनम, चेगूर, हैदराबाद येथील हार्टफुलनेसच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयामध्ये हार्टफुलनेस क्रिकेट स्टेडियम आणि प्रशिक्षण केंद्राच्या आधारशीलेची स्थापना केली. रोहित शर्मा याने दाजींसोबत ध्यानधारणा, सुविधाजनक चिकित्सकांशी संवाद साधणे, ब्रायटर माइंडस् विद्यार्थ्यांद्वारे आश्चर्यकारक संज्ञानात्मक कौशल्यांचे प्रदर्शन पाहणे, वृक्ष लागवड करणे, ग्रीन कान्हाच्या प्राचीन सौंदर्याचे कौतुक करणे आणि मानवी संभाव्यतेच्या विषयांवर चर्चा करण्यात दिवस घालवला. यावेळी रोहित शर्मा याची पत्नी रितिका सोशीत-शर्मासुद्धा त्याच्याबरोबर होती.





























































