टीम इंडियाला मिळणार तुफानी गोलंदाज, हैदराबादच्या उमरान मलिकने केली सरासरी ताशी 150 किमी वेगाने भन्नाट गोलंदाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथील पहिल्या आयपीएल लढतीत सनरायझर्स हैदराबादच्या उमराणी मलिकने सरासरी 150 किमी या भन्नाट वेगाने गोलंदाजी करीत उपस्थित क्रिकेटशौकिनांची माने जिंकली. ही लढत जिंकून राजस्थान रॉयल्सने विजयी सलामी दिली. पण त्यानंतर चर्चा होती ती मलिकच्या तुफानी गोलंदाजीची.

मलिकच्या गोलंदाजीच्या वेगाचे काwतुक करत चाहत्यांनी मलिक हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीचे भविष्य असल्याचे म्हटले आहे. तसेच मलिक लवकरच आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजी करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेकांनी उमरान मलिकच्या पहिल्याच षटकातील 6 चेंडूंच्या वेगाची आकडेवारी शेअर करत आपली मते मांडली.

उमरान मलिकने या सामन्यात एकूण

4 षटके टाकली. यात त्याने 9.75 च्या सरासरीने 39 धावा देत 2 विकेट घेतल्या. मलिकने बटलरची महत्त्वाची विकेट घेत त्याला 35 धावांवर माघारी पाठवल्sै. यानंतर त्याने देवदत्तला 41 धावांवर बाद केले. मलिकच्या या भन्नाट गोलंदाजीची चर्चा लढतीनंतर सर्वत्र सुरू होती. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीची कश्मिरातून एक नवा हिरा सापडला असल्याचे क्रिकेटशौकीन बोलत होते.

यंदाच्या आयपीएल 2022 च्या हंगामाचा पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्सला 211 धावांचे लक्ष्य दिले. मात्र सनरायझर्सला 20 षटकात 7 बाद केवळ 149 धावाच करता आल्या. या विजयासह राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

उमरानच्या पहिल्या षटकातील भन्नाट वेग

ताशी 143 किमी
ताशी 143 किमी
ताशी 150 किमी
ताशी 148 किमी
ताशी 146 किमी
ताशी 144 किमी

आयपीएलमधील सर्वात, वेगवान गोलंदाजीचे विक्रम

शॉन टेट 157.71 किमी प्रति तास
एन्रिच नॉर्तजे 156.22 किमी प्रति तास
एन्रिच नॉर्तजे 156.21 किमी प्रति तास
एन्रिच नॉर्तजे 154.74 किमी प्रति तास
एन्रिच नॉर्तजे 154.21 किमी प्रति तास
डेल स्टेन 154.4 किमी प्रति तास
पॅगिसो रबाडा 154.23 किमी प्रति तास