
हैदराबादमधील प्रसिद्ध बाळापूर गणेशच्या 21 किलोच्या लाडूचा लिलाव तब्बल 24.60 लाख रुपयांना झाला. शुक्रवारी झालेल्या लिलावात स्थानिक व्यापारी व्ही. लक्ष्मी रेड्डी यांना हा लाडू मिळाला आहे. या लाडूची बोली 1116 रुपयांपासून सुरू झाली आणि काही मिनिटांतच लाखो रुपयांच्या घरात ही बोली पोहोचली.
1994 मध्ये झालेल्या पहिल्या लिलावात लाडू 450 रुपयांना विकला गेला होता. तेव्हापासून या मिठाईची लोकप्रियता आणि किंमत वाढली आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, हा लाडू त्यांच्यासाठी चांगले आरोग्य, समृद्धी आणि नशीब घेऊन येतो. यामुळे व्यापारी-राजकारणी दरवर्षी बोली लावण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. गेल्या वर्षी या लाडूचा 18.90 लाख रुपयांना लिलाव झाला होता.





























































