2014-19 मध्ये खासदार झालो असतो, पण अंतर्गत वादामुळे संधी मिळाली नाही; राम शिंदेंनी यंदाही दर्शवली इच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ram-shinde-bjp-mla

भाजपच्या नेत्यांना आता निवडणुकांचे वेध लागले असून काही आमदार आता खासदार होण्यासाठी तयारी करू लागले आहेत. आमदार राम शिंदे यांनी तर आपली इच्छा बोलून दाखवली आहे.

‘मी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे. जर मला पक्षाकडून संधी मिळाली तर मी लोकसभा सुद्धा नगर मधून लढण्यासाठी तयार आहे’, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

नगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता आमदार शिंदे म्हणाले की, 2014 मध्ये मी लोकसभा लढवावी असा विषय होत होता, मात्र त्यावेळेला राजकारण पाहतात कर्जत -जामखेड या ठिकाणी मी विधानसभा निवडणूक लढवली त्यानंतर 2019 मध्ये मला पुन्हा संधी आलेली होती त्यावेळेला माजी खासदार दिलीप गांधी, प्रताप ढाकणे व मी असे आम्ही तिघेही लोकसभे करता इच्छुक होतो, मात्र आमच्या अंतर्गत वादामुळे ते शक्य झाले नाही व शेवटी गांधी यांना उमेदवारी देण्यात आली, असे ते म्हणाले. मात्र आता मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी नगर मधील लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे व ती निवडणूक लढवेल, असेही आमदार राम शिंदे म्हणाले.

पक्षाने माझ्यावर कर्नाटकची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना तिथे नियुक्त केलेले आहे. मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सुद्धा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे आम्ही सुद्धा आता या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले.

राज्यामध्ये ज्या काही सध्या घडामोडी चालू आहेत. या संदर्भात विचारले असता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या संदर्भामध्ये जे काही विषय चालू आहे हे शंकेला वाव देणारे आहे, जर तसे नसेल तर अजित पवारांनी हे सांगण्यासाठी एवढा वेळ का लावला असा सवाल सुद्धा शिंदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये अजूनही शंका कायम असल्याचेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य काळामध्ये जे जे कोणी विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत ते आता भाजपमध्ये देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत असं सांगतानाच यामध्ये एकनाथ शिंदे असो अथवा राधाकृष्ण विखे असो ते देवेंद्रचा नेतृत्वाखाली आले आहेत तसेच अजित पवार सुद्धा येणार होते पण त्यांनी या सर्व वावड्या असल्याचे सांगितले असं ते म्हणाले.