
सामना प्रतिनिधी । बीड
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे अपप्रचार करत आहेत, काका – पुतण्याचा वाद अशा बातम्या पसरवत आहेत मात्र मी माझ्या काकांशी आणि पक्षाशी प्रामाणिक आहे, असा खुलासा माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे नेते जयसिंह सोळुंके यांनी केला आहे
गेल्या काही दिवसांपासून अजून एक मोठ्या घराण्यात राजकीय भूकंप होणार, चुलत्यावर नाराज असलेला पुतण्या बंड करणार अशा बातम्या पसरवण्यात आल्या होत्या या बातम्यांवर आज माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांचे पुतणे आणि धैर्यशील सोळुंके यांचे पुत्र जिल्हापरिषद सदस्य जयसिंह सोळुंके यांनी विरोधकांचा समाचार घेत आरोपाचे खंडन केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, पराभवाच्या धास्तीने अफवा पसरवत आहेत, माझ्या काकांवर माझी पूर्ण निष्ठा आणि पक्षावर माझा विश्वास आहे. पदासाठी मी विरोधकांच्या आमिषाला बळी पडण्याइतका तकलादू नाही, समर्थकांनी अफवांवर विश्वास ठेवू असे नये आवाहन त्यांने केले. तसेच आपण निष्ठेने आणी प्रमाणिकतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असल्याचे जयसिंह सोळुंके यांनी स्पष्ट केले.


























































