मध्यमगती नाही, मी तर वेगवान गोलंदाज – रसेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेररक्षणामध्ये धमाकेदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू आंद्रे रसेलचा वाटा महत्त्वाचा होता. पाकिस्तानविरुद्ध लढतीमध्ये रसेल क्षेत्ररक्षण करताना गुडघा धरून बसल्याने प्रेक्षकांच्या काळाजाचा ठोका चुकला होता. परंतु रसेलने दोन बळी घेत आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. याबाबत बोलताना रसेल म्हणाला की मला मध्यमगती गोलंदाजी म्हणू नका, मी वेगवान गोलंदाज आहे.

रसेल म्हणाला की, मला काही महिन्यांपासून गुडघ्याचा त्रास होत आहे. पुढच्या लढतीसाठी माझ्याकडे पाच दिवस असल्याने मला कशाची चिंता नाही. तसेच तो पुढे म्हणाला की, गोलंदाजी करताना मैदानावरील स्क्रिनवर माझ्या नावापुढे मध्यमगती गोलंदाज असे लिहून येते तेव्हा मला वाईट वाटते. मला वेगवान गोलंदाजी म्हणून संबोधत जा. मी 90 किमी. प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतो. मला रागही येतो. माझ्या नावापुढे आता वेगवान गोलंदाज लावायला हवे.