
सामना ऑनलाईन । मुंबई
कोल्हापूर, सांगली येथे पूरग्रस्तांना मदतीसाठी हवाईदल सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढणे व त्यांना अन्नाचे पाकिटे देण्याचे कामही हवाई दलाचे जवान करत आहे. परंतु हेलिकॉप्टरमधून फेकलेली अन्नाच्या पाकिटांची पाण्यात पडून नासाडी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हवाईदलाने अनोखी शक्कल लढवली आहे. एअर लिफ्ट वेळी वापरण्यात येणाऱ्या बास्केटमधून अन्न पदार्थ पोहोचवण्यात येत आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीवेळी हेलिकॉप्टरमधून अन्न पदार्थांची पाकिटे फेकल्याने अन्नाची नासाडी अधिक होते. हे लक्षात आल्यावर एअर लिफ्ट वेळी वापरण्यात येणाऱ्या बास्केटमधून अन्न पदार्थ पोहोचवण्यात येत आहेत. त्यामुळे पदार्थ वाया जात नाही आणि पूरग्रस्तांपर्यंत पदार्थ व्यवस्थित पोहोचू लागले.



























































