
जागतिक बाजारपेठेशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने दुसऱया भाषेतील कौशल्याची वाढ झाली आहे आणि या कौशल्यामुळेच गतिशीलतेची व्याप्ती वाढत आहे. याची दखल घेऊन भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेने (ICAI) आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापार, सेवा आणि डब्ल्यूटीओच्या विकास समितीमार्फत सदस्य/विद्यार्थ्यांसाठी स्पॅनिश, जर्मन, जपानी, बिझनेस इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतील ऑनलाइन प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. देशातील परदेशी दूतावासांच्या संबंधित भाषा आणि सांस्कृतिक केंद्रांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आयसीएआयचे अध्यक्ष सीए (डॉ.) देबाशीस मित्रा यांच्या मते व्यवसायांसाठी संप्रेषणाच्या भाषेत प्रावीण्य प्राप्त करत आयसीएआयचे सदस्य आणि विद्यार्थी त्यांच्या तांत्रिक कौशल्यात मोलाची भर घालू शकतात आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिक संबंध जोपासत त्यांची उत्तम सेवा करू शकतात.





























































