इचलकरंजीत IGM रूग्णालयात 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजन टँक, 200 गंभीर रूग्णांची होणार सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीपीआरमध्ये 20 हजार लीटर लिक्वीड ऑक्सिजन टँक बसविल्यानंतर काल मंगळवारी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. याद्वारे इंचलकरंजी परिसरातील दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली आहे. शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सतरा फूट उंच, दोन फूट व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक काल मंगळवारी बसविण्यात आला. सोबतच 200 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा टँक बसविण्यात आला.