ओमायक्रोन संसर्ग वाढला तर ‘नाईट कर्फ्यू’ लावा! केंद्राचे राज्यांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभर ओमायक्रोनचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. ओमायक्रोन हा डेल्टापेक्षा तिप्पट वेगाने फैलावतो. त्यामुळे राज्यांनी याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात करावी, आवश्यकतेनुसार तातडीने नाईट कर्फ्यू लावावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज सर्व राज्यांना दिले.

ओमायक्रोनचा मुकाबला करण्यासाठी ‘वॉर रुम’ कार्यान्वित केले पाहिजेत. सध्या देशात ओमायक्रोन आणि डेल्टाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे स्थानिक, जिल्हा पातळीवर तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असे आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच गर्दी टाळण्याबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले.