इफ्फी नोव्हेंबरमध्ये! यंदापासून सत्यजित रे जीवनगौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

52व्या इफ्फी अर्थात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची घोषणा नुकतीच केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  केली आहे. 20 ते 28 नोव्हेंबर या काळात हा महोत्सव गोव्यात होणार आहे. महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वेळी इफ्फीमध्ये विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील सर्वेत्कृष्ट कामगिरीसाठी ‘सत्यजित रे जीवनगौरव’ पुरस्कार या वर्षापासून दरवर्षी इफ्फीमध्ये देण्यात येणार आहे.

इफ्फी  हा आशियातील सर्वात जुना आणि देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. जानेवारी 2021मधील 51व्या आवृत्तीचे यश लक्षात घेता इफ्फीची 52वी आवृत्ती संमिश्र स्वरुपात आयोजित केली जाईल. गोवा राज्य सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करते. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि देशासह जगातील सर्वेत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात. इफ्फीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2021पर्यंत नोंदणी करता येईल.