आमदार निवासात वळसे पाटील यांच्या रूमचे छत कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विस्तारित आमदार निवासमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या रूमचे छत कोसळल्याची घटना आज घडली. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर जोरदार टीका होत आहे. ही घटना घडली तेव्हा रूममध्ये कुणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला.