पालघरमध्ये बंदी असताना टायर जाळण्याचा उद्योग

पालघरमध्ये जुने टायर जाळून त्यापासून तेल बनवणाऱ्य 19 उद्योगांपैकी 10 उद्योग सरकारने बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, असे असूनही यातील काही उद्योग बेकायदेशीरपणे सुरू आहेत. त्यामुळे होणाऱ्य धूर, सांडपाणी यामुळे होणाऱ्य प्रदूषणामुळे रहिवासी त्रस्त आहेत. याप्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात प्रवीण दरेकर, सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.