
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी सध्या जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहे. येथे माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी जम्मूमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मी कश्मिरी पंडीत आहे. जम्मू-कश्मीरला येतो तेव्हा स्वत:च्या घरी आलोय असे वाटते, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी गुरुवारी माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. रात्रभर तेथे मुक्काम केल्यानंतर ते जम्मूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-कश्मीरला येतो तेव्हा घरी आल्यासारखे वाटते. काल मी माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलो होते, त्यावेळी मला असे वाटते मी घरीच आलोय. मी आणि माझे कुटुंबिय कश्मिरी पंडीत आहेत. कश्मिरी पंडीत माझे बंधूच असून मी त्यांची मदत करेन. मी जे काही बोलतो ते खरे बोलतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
Whenever I visit Jammu and Kashmir, I feel have come home. My family has a long relationship with J&K: Congress leader Rahul Gandhi in Jammu pic.twitter.com/KP6JvuXnFH
— ANI (@ANI) September 10, 2021
























































