आयएमएने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगगुरू बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथीवरुन केलेल्या विधानावरून त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव यांनी आपले विधान मागे घेतले आहे. याच दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पतंजलीचे मालक रामदेव यांच्या वतीने लसीविरूद्ध केला जाणाऱ्या खोट्या प्रचारस बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

आयएमएने बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची केली मागणी

आयएमएने म्हटले आहे की, एका व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, 10 लाख डॉक्टर आणि लाखो लोकांना कोरोनाची लस देऊन ही त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असं आयएमएने म्हटले आहे.

देशातील कोरोना संकटात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरू आहेत. या लढय़ात आतापर्यंत 1200 अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना प्राण गमवावा लागला आह, असे असताना रामदेवबाबांनी अ‍ॅलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयएमएच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. याआधीही रामदेवबाबांच्या पतंजलीच्या कोरोना औषधावरून वाद झाला होता.