
सामना ऑनलाईन । हैदराबाद
तेलंगणातील निझामाबाद लोकसभा मतदारसंघात 170 शेतकऱयांसह एकूण 185 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. एवढी नावे मतदान यंत्रात (ईव्हीएम) मावणे अशक्य झाल्याने निवडणूक आयोगाने या मतदारसंघात चक्क परंपरागत मतदान पत्रिका मतदानासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मतपत्रिकेच्या एकाच कागदावर सर्व उमेदवारांची नावे आणि निवडणूक चिन्ह छापणे सोपे आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने निझामाबादमध्ये अशाप्रकारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
























































