आतापर्यंत 24 लाख करदात्यांना मिळाला आयकर रिफंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्या 24 लाख करदात्यांना ऱिफंड दिला आहे. त्यात कार्पोरेट सेक्टरमधील करदात्यांना सुमारे 50 हजार कोटींचा रिफंड देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सीबीडीटीने याबाबतची माहिती दिली आहे.

1 एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या काळात 23.99 लाख करदात्यांना रिफंड जारी करण्यात आला आहे. या रिफंडची रक्कम 67,401 कोटी रुपये एवढी असल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे. सीबीडीटीने शनिवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. देशभरात वैयक्तीक आणि कीर्पोरेट स्तरावर आयकर वसूल करण्यात येतो.

आतापर्यंत एकूण 22,61,918 वैयक्तीक करदात्यांना 16,373 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे. तर कार्पोरेट सेक्टरमधील 1,37,327 करदात्यांना 51,029 कोटींचा आयकर रिफंड जारी करण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून 31 ऑगस्टपर्यंत हा रिफंड देण्यात आला आहे.

आयकर विभागाने विवरणपत्र भरण्यासाठी नवी वेबसाईट आणली होती. त्यात तांत्रिक अडचणीमुळे विवरणपत्र भरताना अनेकांना त्रास होत होता. विवरणपत्र भरताना अडचणी येत असल्याचा अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आयकर विभागाने विवरणपत्र भरण्याची मुदत 31 ऑगस्टऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.