पवारांच्या नातेवाईकांवर तिसऱया दिवशीही आयकर धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर सलग तिसऱया दिवशी आयकर विभागांकडून छापेमारी सुरूच आहे. अजित पवार यांच्याशी संबंधितांचे कोल्हापूर, पुणे, बारामती, नगरमधील कारखाने आणि घरांच्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे.

n कोल्हापुरात अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊस तसेच मोदीबागेत नीता पाटील आणि पंचवटीमध्ये रजनी इंदुलकर राहतात. या ठिकाणी सलग तिसऱया दिवशी आयकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी झडती घेत आहेत.

n नंदुरबारच्या आयान मल्टिट्रेड कारखान्यात काल रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पुणे जिह्यातील बारामतीत श्रायबर डायनामिक्स मिल्क डेअरीत आणि दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगरमध्ये तपासणी सुरू आहे.