धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला दिला धोबीपछाड

हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील दुसरा एक दिवसीय सामना मंगळवारी खेळला गेला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 276 धावांचे आव्हान 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत टीम इंडियाने यजमान संघाचा 3 विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडियाने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाने केला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला आतापर्यंत 93 वेळा हरवले आहे. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 92 वेळा पराभव केला आहे, तर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 एक दिवसीय सामने जिंकले आहेत. आता या यादीत टीम इंडियाने पहिले स्थान पटकावले आहे.

हातातोंडाशी आलेला सामना गमावल्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक मैदानातच भिडले, व्हिडीओ व्हायरल

दिपक चमकला

श्रीलंकेला 275 धावांवर रोखल्यानंतर टीम इंडियाने दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर विजय मिळवला. दोघांनी आठव्या विकेटसाठी 84 धावांनी नाबाद भागिदारी केली. दिपक चहर याने 82 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या, तर भुवनेश्वर कुमार याने नाबाद 19 धावा काढत त्याला चांगली साथ दिली.

द्रविडचा कानमंत्र आणि दिपक चहरने सामना दिला जिंकून, जाणून घ्या काय होता ‘तो’ मेसेज

23 जुलैला अखेरचा सामना

दरम्यान, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 23 जुलैला खेळला जाईल. हा सामना औपचारिक असला तरी टीम इंडियाला बेंच स्ट्रेंथ आजमावण्याची चांगली संधी आहे.

सलग नववी मालिका जिंकली

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध आपले विजयी अभियान कायम राखले आहे. श्रीलंकेचा सलग नवव्या मालिकेत टीम इंडियाने पराभव केला आहे. 2012 पासून टीम इंडिया अपाराजित असून 24 जुलै, 2012 नंतर श्रीलंकेमध्ये एकही एक दिवसीय सामना टीम इंडियाने गमावलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या