
बीसीसीआयने इंग्लंडविरोधात उरलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा फिटनेस टेस्ट नंतर संघात पुनरागमन करू शकतो. मात्र मोहम्मद शमी व रविंद्र जाडेजा या कसोटी सामन्यांना देखील मुकणार आहेत.
तिसरा कसोटी सामना हा अहमदाबाद येथे पिक बॉलने खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद येथे कसोटी सामन्याआधी उमेश यादवची फिटनेस टेस्ट होणार असून त्यात तो अपयशी ठरला तर संघात शार्दुल ठाकूरला घेण्यात येईल. आणि जर यादवने फिटनेस टेस्ट पास केली तर शार्दुल ठाकूर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल, असे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के.एल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, वृद्धीमान साहा, आर. अश्वीन, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जरप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.



























































