इंडिया आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला तयार, मात्र तो सांगायचो नसतो; नाना पटोलेंचं मोठं विधान

>> सूरज बागडे, भंडारा

राज्यात मंगळवारी आलेल्या निकालात काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक जागा जिंकत बाजी मारली आहे. देशात राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ केली. या यात्रेत जनतेला गॅरंटी दिली त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला. त्यामुळे खऱ्या अर्थानं मोदी विरूद्ध जनता अशी लढाई होती. यात जनतेचा विजय झाला आहे, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलं.

देशात दोन दिवस खूप घडामोडी घडणार आहे. यात इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बनणार आहे. फॉर्म्युला तयार आहेत ते सांगायचें नसतात, असं म्हणत नाना पटोले यांनी उत्सुकता अधिक वाढवली आहे.