
शुक्रवारी म्हणजेच 5 जून रोजी वर्षाचं दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे. याआधी 10 जानेवारी रोजी वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण झालं होत. हे चंद्रग्रहण छायाकल्प किंवा मांद्य प्रकारचे असणार आहे. 5 जून रोजी लागणारे चंद्रग्रहण रात्री 11.15 वाजता सुरू होईल व रात्री 2.34 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण ज्येष्ठ पौर्णिमेला होत आहे. चला तर जाणून घेऊ हे चंद्रग्रहण केव्हा आणि कोठे दिसेल आणि हिंदुस्थानावर त्याचा किती परिणाम होईल.
कुठे दिसेल चंद्रग्रहण?
हे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत दिसेल. हिंदुस्थानातही हे ग्रहण वेळेवर दिसेल. हे चंद्रग्रहण रात्री 11:15 ते रात्री 2.30 पर्यंत चालेल, म्हणजे त्याचा एकूण कालावधी सुमारे तीन तास असेल. ग्रहण काळात चंद्र आपल्या पूर्ण आकारात दिसणार आहे. तसेच पंचांगानुसार ग्रहण काळात चंद्र वृश्चिक राशीत असेल.
चंद्रग्रहणाचे खास वैशिष्ट्य काय आहे?
यावेळीचे चंद्रग्रहण छायाकल्प ग्रहण असणार आहे. शास्त्रात छायाकल्प चंद्रग्रहणाला ग्रहण मानले जात नाही. म्हणून या दिवशी कोणतेही काम करण्यास बंधन नसणार. दरम्यान, वर्ष 2020 मध्ये एकूण 6 ग्रहण लागणार आहेत. ज्यात 2 सूर्यग्रहण आणि 4 चंद्रग्रहणाचा समावेश आहे.


























































