
हिंदुस्थानसाठी एक गोड बातमी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात 6 जूनपर्यंत 5.16 लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त 1,18,553 टन साखर ही सोमालियाला पाठवण्यात आली आहे. अखिल भारतीय साखर व्यापार संघ (एआयएसटीए) ने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, सोमालियानंतर सर्वात जास्त साखर निर्यात करण्यात आलेल्या देशांमध्ये श्रीलंकेला 72,833 टन, तर अफगाणिस्तानला 68,609 टन साखर निर्यात करण्यात आली आहे.