हिंदुस्थानी महिलांना विजेतेपद, सरस गोलफरकाच्या आधारे जिंकली ज्युनियर तिरंगी हॉकी स्पर्धा

389

कॅनबेरा येथे खेळविण्यात आलेल्या तिरंगी ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन संघाकडून हिंदुस्थानी महिलांना 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघांचे 7-7 गुण झाले असतानाही सरस गोलफरकाच्या आधारे हिंदुस्थानला विजेतेपद बहाल करण्यात आले. या स्पर्धेतील 4-4 लढती जिंकून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघांनी प्रत्येकी 7 गुण मिळवले होते. अंतिम साखळी लढतीत हिंदुस्थानी संघाच्या वतीने एकमेव गोल गगनदीप कौर हिने नोंदवला.

हिंदुस्थानी ज्युनियर महिला संघाने या तिरंगी स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत तीन लढती जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियन महिलांनी 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर गगनदीप कौरने 53 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली, पण हिंदुस्थानी संघाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 56 व्या मिनिटाला एबीगेलने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत यजमान ऑस्ट्रेलियन संघाला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या काही मिनिटांत हिंदुस्थानी फॉरवर्डस्नी बरोबरीसाठी जोरदार संघर्ष केल, पण यजमान संघाच्या बचावफळीने त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरवले.

आपली प्रतिक्रिया द्या