…तोपर्यंत हिंदुस्थानशी चर्चा नाहीच, इम्रान यांची आडमुठी भूमिका कायम

1038

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानचा आकांडतांडव सुरू आहे. युद्धाची दर्पोक्ती आणि अणूहल्ल्याची धमकी देणाऱ्या इम्रान खान यांनी मुस्लीम राष्ट्रांनी हिंदुस्थानची मागच्या दरवाजाने चर्चा करण्याचे आवाहन केले होते. परंतु इम्रान खान यांची आडमुठी भूमिका कायम आहे.

जम्मू-कश्मीरमधून कर्फ्यू हटवला जात नाही आणि नागरिकांवरील निर्बंध उठवले जात नाही तोपर्यंत हिंदुस्थानची द्विपक्षीय चर्चा केली जाणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी पत्रकारांनी कलम 370 बाबत हिंदुस्थानसोबत चर्चेचा प्रश्न विचारला असता इम्रान यांनी हिंदुस्थानशी चर्चा करण्याचा प्रश्नच नाही असे उत्तर दिले.

PoK हिंदुस्थानचेच
तत्पूर्वी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच आहे आणि लवकरच तो हिंदुस्थानात असेल असे वक्तव्य केले. पाकव्याप्त कश्मीरचा भूभाग भौगोलिकदृष्ट्या लवकरच हिंदुस्थानात असेल असे त्यांनी स्पष्ट केले. जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवणे ही हिंदुस्थानची अंतर्गत बाब असून हा द्विपक्षीय मुद्दा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्ताने जयशंकर बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या