India Pakistan War – थोडीतरी अक्कल वापरा…; ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमध्ये सीमाभागात रात्रभर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून शिबिरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली आणि विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ओमर अब्दुल्ला यांनी हिंदुस्थानच्या सैन्याचे कौतुक करत पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

जम्मू-कश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने रात्रभर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली. पाकिस्तान सीमेवर नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आहे. हे नागरिक सध्या सांबा येथे सुरक्षित ठिकाणी राहत आहेत.

Operation Sindoor पार्श्वभूमीवर देशभरामध्ये 26 विमानतळं बंद, दिल्लीमधील 90 उड्डाणे केली रद्द

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकने ड्रोनचा वापर केला. मात्र, त्यांची सर्व ड्रोन पाडले. त्याचे श्रेय आपल्या संरक्षण दलांना जाते. कश्मीरमधील अनंतनाग येथील एका दारूगोळा डेपोलाही लक्ष्य करण्यात आले होते. परंतु तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या परिस्थितीला पाकिस्तान कारणीभूत आहे. पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले आणि आपण त्याला प्रत्युत्तर दिले, अशा शब्दांत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानवर टीका केली.

LIVE अपडेट Operation Sindoor: पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, LoC वर अधून मधून गोळीबार

पाकिस्तान सातत्याने परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण यात पाकिस्तानला कधीच यश येणार नाही आणि कुठलाही फायदा होणार नाही. यापेक्षा त्यांनी शस्त्र खाली ठेवावी. काल रात्री नऊ वाजता हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पहाटे साडेचार वाजता गोळीबार सुरू केला. पाकिस्तानला परिस्थिती आणखी चिघळवायची आहे आहे स्पष्ट आहे. पण परिस्थिती चिघळल्यानंतर सर्वाधिक नुकसान हे पाकचे होणार आहे. यामुळे त्यांनी थोडीतरी अक्कल वापरावी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुनावले.