
देशात कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशभरातील सक्रिय रुग्णसंख्या 1010 च्या पुढे गेली आहे. यात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आणि दिल्ली या प्रमुख राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये नवीन रुग्ण आढळून येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मास्क परिधान करणे, सोशल डिस्टेंसिंग राखणे आणि लसीकरण पूर्ण करण्यासह मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात 209, दिल्लीत 104, गुजरातमध्ये 83 आणि कर्नाटकात 47 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशात 15 रुग्ण आढळले आहेत. आयसीएमआरचे संचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की, आतापर्यंत देशात 4 प्रकार आढळले आहेत. यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 प्रकारांचा समावेश आहे.
केरळमध्येही कोविड रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात येथे 150 हून अधिक नवीन रुग्ण नोंदवले गेले. तिरुवनंतपुरम आणि कोझिकोड येथे रुग्णसंख्या जास्त आहे. स्थानिक प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. आतापर्यन्त येथील एकूण रुग्ण संख्या 430 वर गेली आहे.





























































