
हिंदुस्थानने तब्बल चार वर्षांनंतर अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहेत. तालिबानने 2021 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर हिंदुस्थानने सर्व व्हिसा सेवा बंद केल्या होत्या. आता हिंदुस्थानने सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अफगाण नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. ज्यात विद्यार्थी, व्यावसायिक, वैद्यकीय, वैद्यकीय सहाय्यक, एण्ट्री आणि युनायटेड नेशन्स डिप्लोमॅट व्हिसांचा समावेश आहे.
ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया
केंद्र सरकारने यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे, ज्यावर ‘अफगाण व्हिसा (अफगाण नागरिकांसाठी)’ असे एक विशेष मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे अफगाण नागरिक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बायोमेट्रिक तपशील अनिवार्यपणे हिंदुस्थानात आगमनानंतर इमिग्रेशन कार्यालयात नोंदवले जातील.