तुर्कीला ब्रिक्सची दारे बंदच; प्रस्ताव फेटाळून लावला

तुर्कीसाठी ब्रिक्सची दारे बंदच राहणार आहेत. हिंदुस्थान, रशिया आणि चीनने तुर्कीचा ब्रिक्स संघटनेत सहभागी होण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तय्यप एर्दोगन यांनी अनेकदा जाहीरपणे ब्रिक्सचे सदस्य होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.