
सैनिकांचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या मिलिटरी अपशिंगे (ता. जि. सातारा) या गावाच्या सन्मानार्थ लष्कराने नुकताच एक रणगाडा दिला आहे. पुढील पिढय़ांमध्ये देशाभिमानाचे, देशसेवेचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी गाकच्या प्रकेशद्वारावर मुख्य रस्त्यालगत हा रणगाडा विराजमान करणे आवश्यक असताना त्याची आतील बाजूला एका कोपऱयात रणगाडय़ाची ‘सोय’ लावल्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याची भावना माजी सैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सातारा तालुक्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावपासून तारगावकडे जाणाऱया मार्गावर मिलिटरी अपशिंगे हे गाव आहे. या गावातील घरटी माणूस लष्करी सेवेत आहे. एकेका घरात चार-चार फौजी आहेत. अगदी शिवकालापासून सैनिकी परंपरा जोपासत आलेल्या या गावातील अनेकांनी लष्करात मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल यांसारख्या उच्च पदांकर काम केले आहे. त्यामुळे गावाचे नावच ‘मिलिटरी अपशिंगे’ झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र अपशिंगेला याच नावाने ओळखतो.
अशी सैनिकी परंपरा असलेल्या गाकांच्या सन्मानार्थ त्या गावांच्या लष्करी सेवेची ओळख अधिक ठसठशीतपणे बाह्य जगासमोर यावी, या उद्देशाने शौर्याचे प्रतीक असलेले रणगाडे, तोफा दिल्या जात असतात. तरुणांमध्ये देशसेवेची भाकना वाढीस लागावी, त्यांना सैन्यभरतीसाठी प्रोत्साहन मिळावे, हा रणगाडे व तोफा देण्यामागचा मूळ उद्देश असतो. गाकच्या प्रवेशद्वारावरच ही प्रतीके दिमाखात उभी राहिली पाहिजेत, जेणेकरून त्या गावच्याच नव्हे, तर त्या मार्गावरून प्रवास करणाऱया लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहावेत, त्यांचा ऊर अभिमानाने भरून यावा.
ज्याप्रमाणे एखाद्या मौल्यवान कस्तूची जागा गोणपाटात नसते, त्याप्रमाणे सीमेवर पराक्रम गाजवलेल्या व दुश्मनांना धडकी भरवलेल्या अशा प्रतीकांची जागा अडगळीत असू नये हीच अपेक्षा असते. पुण्याला कॅण्टोन्मेंट भागात तसेच कोल्हापूरला टेंबलाई नाका परिसरात अशा प्रतीकांना उचित जागा मिळालेली पाहायला मिळते. अगदी सातारा येथे पोवई नाक्यावरून सोलापूरकडे जाणाऱया मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत सैनिक स्कूल मैदानावर, कराडला टाऊन हॉलच्या प्रवेशद्वारावर ही प्रतीके डौलाने उभी असलेली दिसतात, पण मिलिटरी अपशिंगे गावात या रणगाडय़ाच्या बाबतीत जो प्रकार झाला आहे, तो संवेदनशील माजी सैनिकांना खटकत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.
अपशिंगे गावात नुकताच हा रणगाडा दाखल झाला. त्याचा सर्वत्र गाजावाजाही झाला. हा रणगाडा आता गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिमाखात उभा राहिलेला पाहायला मिळेल, असे जिल्हावासीयांनी गृहीत धरले असेल. मात्र, उत्सुकतेने इथे पाहायला येतील, तेव्हा त्यांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही. महामार्गाकडून अपशिंगेच्या रस्त्याला लागल्यानंतर गावच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर गावच्या पूर्व बाजूला असलेल्या ब्रिटिशकालीन सभागृह, गोडाऊनच्या परिसरात चौथरा बांधून त्यावर हा रणगाडा विराजमान केला आहे. गावाबाहेरून जाणाऱया बोरगाव-तारगाव रस्त्यावरून तो दिसत नाही.
‘ही’ उठाठेव कोणाची, जागा वाचविण्यासाठी?
काही कामानिमित्त त्या रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग येणाऱया व मिलिटरी अपशिंगेचा लष्करी सेवेचा इतिहास फारसा माहिती नसणाऱया लोकांना कदाचित गाव मागे गेलेलेही लक्षात येणार नाही. त्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्यासारखे झाले आहे. भटकंती करणाऱयांना सहज लक्षात येण्यासाठी ही प्रतिके गावच्या प्रवेशद्वारावरच असणे गरजेचे आहे. पण, कोणाची जागा वाचविण्यासाठी ही उठाठेव केली गेली का, हेदेखील स्पष्ट होणे गरजेचे आहे. संबंधितांनी चूक सुधारावी हीच माजी सैनिकांची अपेक्षा आहे.


























































