
ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून माईंडगेम सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षक जस्टीन लँगर, कर्णधार टीम पेन व स्टार खेळाडू स्टीवन स्मिथ यांनी टीम इंडियाला टार्गेट करीत मालिकेआधीच वातावरण तापवले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्प टेलर यांनी रविवारी हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीचे काैतुक करताना म्हटले की, विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील पॉवरफुल्ल खेळाडू आहे. आक्रमक क्रिकेटपटूसह तो आत्मसंयमही कायम राखतो.
विराट कोहलीच्या खांद्यावर जी कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आलीय, त्याबद्दल त्याला आदर आहे. सध्या तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. एवढेच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील प्रभावशाली खेळाडूही आहे. विराट कोहलीला कसोटी क्रिकेट आवडते. हिंदुस्थानसाठी ही चांगली बाब आहे. कारण विराट कोहलीचा प्रभाव हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमी व युवा खेळाडूंवर पडतो. त्यामुळेच हिंदुस्थानात कसोटी क्रिकेटलाही चांगला प्रतिसाद लाभतो, असे मार्प टेलर पुढे म्हणाले.
आमचे वेगवान गोलंदाज सज्ज – लँगर
दोन वर्षांपूर्वी हिंदुस्थानने आम्हाला आमच्याच देशात हरवले. टीम इंडियाचा संघ तेव्हा चांगला फॉर्ममध्ये होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आमचे वेगवान गोलंदाज आगामी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. मिचेल स्टार्प, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांच्यासह जेम्स पॅट्टीनसन, मायकेल नेसर व सीन अॅबॉट या वेगवान गोलंदाजांमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यावेळी म्हणाले.
कोहलीच्या फलंदाजीवर प्रेक्षक फिदा पण…
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने रविवारी विराट कोहलीबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले की, विराट कोहलीची फलंदाजी बघण्यासाठी ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमी, प्रेक्षक स्टेडियमकडे धाव घेतात. पण आम्ही त्याला जास्त काळ खेळपट्टीवर टिपू देणार नाही. माझ्यासाठी तो प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आहे. आम्ही फक्त नाणेफेकीदरम्यान भेटतो. एकमेकांशी नाते जोडण्याचा संबंधच नाही, असे सांगत त्याने माईंडगेम खेळण्याचा प्रयत्न केला.
दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱया लक्ष्य आर्ट फाऊंडेशन या संस्थेतर्फे पैठणीसाठी वापरल्या जाणाऱया कपडय़ापासून दिवाळीनिमित्त आकाश कंदील तयार करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर यांना हा विशेष कंदील देण्यात आला. यावेळी लक्ष्य फाऊंडेशनच्या सोनाली बाणे, माजी उपविभागप्रमुख भारत म्हाडगुत आदी मान्यवर उपस्थित होते.
























































