
बांगलादेशच्या भूमीवर सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना धक्का देणाऱया थायलंडवर एकतर्फी विजय मिळवून हिंदुस्थानी महिलांनी त्यांना गुडघे टेकायला लावले. हिंदुस्थानने थायलंडचा संघ अवघ्या 37 धावांमध्ये गुंढाळला. 38 धावांचे आव्हान अवघ्या 6 षटकांमध्ये पूर्ण करून हिंदुस्थानने हा सामना 9 विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयासह हिंदुस्थानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तान महिला संघाकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर हिंदुस्थानी महिला संघाचा विजयरथ पुन्हा एकदा रुळावर आला आहे. यजमान बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर आज हिंदुस्थानी महिलांनी अनोखी कामगिरी करत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवला.
फक्त एका थाई फलंदाजाच्या दोन आकडी धावा
थायलंडची टीम प्रथम फलंदाजी करत होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर खेळणे त्यांना जमत नव्हते. फक्त 15.1 ओव्हर्समध्ये थायलंडची संपूर्ण टीम तंबूत परतली. थायलंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. फक्त एका फलंदाजाने दोन आकडी धावसंख्या गाठली. सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजाचा स्कोअर 12 होता.
























































