
सामना ऑनलाईन । मुंबई
इंग्लंडचा दीर्घ दौरा झाल्यानंतर हिंदुस्थानचा संघ आशिया कपसाठी यूएईला रवाना होणार आहे. आशिया कपनंतर हिंदुस्थानचा संघ मायदेशात वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
BCCI announces fixtures for home series against West Indies.#TeamIndia will play 2 Tests, 5 ODIs & 3 T20Is during this tenure.
Full details here – https://t.co/cNFmBdqjvL #INDvWI pic.twitter.com/etVMdIpfer
— BCCI (@BCCI) September 4, 2018
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, पाच एक दिवसी आणि तीन टी-20 सामने रंगणार आहेत. 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान हे सामने रंगणार आहेत. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्याची सुरुवात 4 ऑक्टोबरला राजकोटमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. तर शेवट 11 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्याने होईल.
हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका –
पहिला सामना (राजकोट) – 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर
दुसरा सामना (हैदराबाद) – 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर
हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज एक दिवसीय मालिका –
पहिला सामना (गुवाहाटी) – 21 ऑक्टोबर
दुसरा सामना (इंदूर) – 24 ऑक्टोबर
तिसरा सामना (पुणे) – 27 ऑक्टोबर
चौथा सामना (मुंबई) – 29 ऑक्टोबर
पाचवा सामना (तिरुवनंतरपूरम) – 1 नोव्हेंबर
हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिका –
पहिला सामना (कोलकाता) – 4 नोव्हेंबर
दुसरा सामना (लखनौ) – 6 नोव्हेंबर
तिसरा सामना (चेन्नई) – 11 नोव्हेंबर
दरम्यान, वेस्ट इंडिजसोबत घरच्या मैदानावर दोन हात केल्यानंतर हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. येथे हिंदुस्थान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.




























































